सफर जंगलाची !!!
नोव्हेंबर २०१२ family स्नेहसम्मेलन नेहेमीप्रमाणे ह्या वर्षी सहलीला कुठे जायचे ह्या प्रश्नावर चर्चा जोरदार रंगली होती. सुरवात पार युरोप पासून झाली. मग हळूहळू मंडळी Middle East , Asia वर आली. दुबई , अबुधाबी , Singapore , Bankok वगैरे नेहेमीची यशस्वी ठिकाणे चर्चिलि गेली. पर बात कुछ जमी नही. त्यामुळे गाडी काही पुढे सरकली नाही. नाताळ २०१२ family स्नेहसम्मेलन पुन्हा एकदा तोच विषय. पुन्हा तीच यादी , पण ह्या वेळेस मात्र गांभिर्याने आणि realistic (कारण पेय पान सोबतीस ) !! काश्मीर पासून सुरुवात करुन मध्य भारतात मंडळी पोहोचली. त्याच वेळेस why not Kerala ? असा विचार मनात चमकला . पण नेहेमीच्या जागा सोडून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जावे हा विचार पक्का झाला. मग offbeat ठिकाणे शोधता शोधता 'वायनाड' नजरेस पडले. Intresting …. अजून शोध घेऊ. Cut to जानेवारी २०१३ …. सर्वानुमते ठिकाण नक्की … 'वायनाड'…. चला एक मोठे काम झाले … आता तारीख ठरवणे … भ्रमण मंडळाच्या तीन famillie...