वाघोबा at ताडोबा भाग - ४
थोडं ताडोबाविषयी . ताडोबाचे (भारतातल्या सगळ्याच टायगर रिसर्व ) २ भाग पडतात . बफर आणि कोअर झोन. नावाप्रमाणेच कोअर झोन हा वाघांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा इथे कोणत्याही प्रकारच्या मानवी अतिक्रमणाला बंदी . वाघाचे वास्तव्य , शिकार , विश्रांती आणि प्रजनन साधारण ह्या भागात असते . बफर झोन हा कोअर च्या बाहेरचा अंदाजे १० किमी पर्यंत , पण संरक्षित . इथे काही भागात मानवी वस्ती , रस्ते असतात . ताडोबाचा कोअर हा जवळपास ६२६ sq . km आणि बफर ११०१ sq km ( जंगल ७०० sq km आणि जंगल नसलेला ४०१ sq km ). बफर झोनच्या सफारीसाठी आरक्षण करता येत नाही , तिथे (गेट) वर त्या त्या वेळेस जाऊन करावे लागते . कोअर सफारी साठी आधीच आरक्षण करावे लागते . दोन्ही ठिकाणी सकाळी ६.३० (उन्हाळ्यामध्ये ६.००) आणि दुपारी ३.०० वाजता मर्यादित गाड्या आंत सोडतात. गाडीत फक्त ६ पर्यटक + १ गाईड + ड्रायव्हर एवढेच प्रवासी. गाडीतून खाली उतरायला बंदी . ताडोबाला खालील प्रमाणे...