Posts

Showing posts from December, 2014

तो आणि आम्ही

Virat ची Adelaide ची  innings बघितली  ....  १९९९ च्या Pakistan विरुद्ध ची आठवण ताजी  झाली.  आज एक वर्ष होऊन गेले त्याला retired होऊन . कित्येक आठवणी चित्रपटा प्रमाणे डोळ्यासमोर तरळल्या . साल १९८७ , तुम्ही शाळेतून धावत पळत घरी येता , पाठीवरचे  दप्तर ही न काढता T .V. लावता. हुश्श  …!!! तो खेळत असतो . आई ने काय पानात वाढलंय  तुमचे लक्ष नसते कारण तुमचे सगळे लक्ष त्याच्याकडे , भारताला जिंकायला  ४१ runs बाकी …. आणि .... umpire च्या चुकीच्या निर्णयामुळे तो बाद होतो. आपण तो सामना १६ runs ने हारतो.  ती त्याची शेवटची test innings असते . सामना अर्थातच पाकिस्तान विरुद्धचा बंगलोरचा . संध्याकाळी वडिल घरी येतात , थोडेसे उदास , नीट जेवत नाहित , म्हणतात सुनील गावस्कर ची शेवटची कसोटी , पुन्हा दिसणार नाही तो खेळतांना. खूप उदास भासतात , आपण खूप लहान असतो, आपल्याला कळत नाही ह्यात एवढे काय आहे , तुम्ही थोडे मोठे म्हणजे कळत्या वयाचे होता , १० पास होऊन junior college मध्ये जाता , नवीन वातावरण , नवीन विषय , आजूबाजूची मुले मुली जी भाषा बोलतात ती तुम्हाला नवीन ,तुम्ही गोंधळता … वाटंत हे सगळे आपल्याला झेप