Posts

Showing posts with the label Marathi

नियतीशी करार

नियतीशी करार -- भाग  १ कधी कधी काही गोष्टी का घडतात आणि त्या तश्याच का घडतात हे आपल्याला समजत नाही. आता हेच पहा ना आपण कारमधून चाललेलो असतो आणि टोल च्या रांगेत नेमकी आपल्या पुढची कार टोल द्यायला टाळाटाळ करते किंवा काही प्रॉब्लेममुळे तिचा टॅग चालत नाही आणि आपण काही कारण नसताना उगीचच ताटकळत बसतो. किंवा कधी कधी उलटही घडतं , आयुष्यातला सगळ्यात छोटा आणि सोपा interview देऊन तुम्ही परदेशात नोकरीनिमित्त  जाता आणि अनेक वर्ष आरामात तिकडे घालवता . ह्याला एकच उत्तर नशीब ,नियती किंवा काहीही म्हणा. असो.  @Abhijit भारतात महिलांच्या क्रिकेटचा एकदिवसीय वर्ल्ड कप सुरु झाला . सामने कुठे कुठे आहेत हे देखील बहुसंख्य लोकांना माहिती नव्हते. भारताने पहिले दोन सामने आरामात जिंकले आणि तिसरा सामना साऊथ आफ्रिके बरोबर हरला ,जवळ जवळ जिंकलेला. पुढचा ऑस्ट्रेलिया बरोबर हि हरला. सामना हरला तरी एक गोष्ट घडली , भारताने ३३० धावा केल्या त्यासुद्धा दिड ओव्हर बाकी ठेऊन कारण आपला संघ आधीच सर्व बाद झाला. ऑस्ट्रेलिया ने सामना तसा आरामात जिंकला , तरी ह्या सामन्याने माझी उत्सुकता चाळवली. भारताचे सामने कुठे कुठे आहेत...

तो आणि आम्ही

Virat ची Adelaide ची  innings बघितली  ....  १९९९ च्या Pakistan विरुद्ध ची आठवण ताजी  झाली.  आज एक वर्ष होऊन गेले त्याला retired होऊन . कित्येक आठवणी चित्रपटा प्रमाणे डोळ्यासमोर तरळल्या . साल १९८७ , तुम्ही शाळेतून धावत पळत घरी येता , पाठीवरचे  दप्तर ही न काढता T .V. लावता. हुश्श  …!!! तो खेळत असतो . आई ने काय पानात वाढलंय  तुमचे लक्ष नसते कारण तुमचे सगळे लक्ष त्याच्याकडे , भारताला जिंकायला  ४१ runs बाकी …. आणि .... umpire च्या चुकीच्या निर्णयामुळे तो बाद होतो. आपण तो सामना १६ runs ने हारतो.  ती त्याची शेवटची test innings असते . सामना अर्थातच पाकिस्तान विरुद्धचा बंगलोरचा . संध्याकाळी वडिल घरी येतात , थोडेसे उदास , नीट जेवत नाहित , म्हणतात सुनील गावस्कर ची शेवटची कसोटी , पुन्हा दिसणार नाही तो खेळतांना. खूप उदास भासतात , आपण खूप लहान असतो, आपल्याला कळत नाही ह्यात एवढे काय आहे , तुम्ही थोडे मोठे म्हणजे कळत्या वयाचे होता , १० पास होऊन junior college मध्ये जाता , नवीन वातावरण , नवीन विषय , आजूबाजूची मु...