Posts

Showing posts from December, 2015

वाघोबा at ताडोबा भाग - ४

Image
थोडं ताडोबाविषयी . ताडोबाचे (भारतातल्या सगळ्याच  टायगर रिसर्व ) २ भाग पडतात . बफर आणि कोअर  झोन. नावाप्रमाणेच कोअर  झोन हा वाघांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा इथे कोणत्याही प्रकारच्या मानवी अतिक्रमणाला बंदी . वाघाचे  वास्तव्य , शिकार , विश्रांती आणि प्रजनन साधारण ह्या भागात असते . बफर झोन हा  कोअर  च्या बाहेरचा अंदाजे १० किमी पर्यंत , पण संरक्षित . इथे काही भागात मानवी वस्ती , रस्ते असतात . ताडोबाचा कोअर  हा जवळपास ६२६ sq . km आणि बफर ११०१ sq km ( जंगल ७०० sq km आणि जंगल नसलेला ४०१ sq km ). बफर झोनच्या सफारीसाठी आरक्षण करता येत नाही , तिथे (गेट) वर त्या त्या वेळेस जाऊन करावे लागते . कोअर  सफारी साठी आधीच आरक्षण करावे लागते . दोन्ही ठिकाणी सकाळी ६.३० (उन्हाळ्यामध्ये ६.००) आणि दुपारी ३.०० वाजता मर्यादित गाड्या आंत सोडतात. गाडीत फक्त ६ पर्यटक + १ गाईड + ड्रायव्हर एवढेच प्रवासी. गाडीतून खाली उतरायला बंदी . ताडोबाला खालील प्रमाणे गेट्स आहेत . मोहोरली - सगळ्यात जुने आणि लोकप्रिय . बाहेर भरपूर Resorts , हॉटेल्स. MTDC चे गेस्ट हाऊस अक्षरश: गेटच्या बाहेर ५०० मि. वर . सकाळ आणि संध्याकाळ प्रत्ये

वाघोबा at ताडोबा भाग - ३

Image
जसजसा माझा Flight चा दिवस जवळ येत होता , तसतशी माझी हुरहूर वाढत चालली होती . एक तर मी जवळपास ६ महिन्यांनी घरच्यांना भेटणार होतो , जरी Skype वर जवळजवळ रोज भेटणं होत होतं तरी प्रत्यक्ष भेटणं वेगळंच . दुसरे म्हणजे ताडोबा खुणावत होता . दरम्यान इतर तयारी सुद्धा जोरात चालू होती . Driving खालोखाल माझा दुसरा शौक म्हणजे Photography . माझ्याकडे ७० -३०० mm ची लेन्स  आहे पण birding साठी ही कमी पडेल असं वाटलं , तेव्हा Reantal लेन्सचा शोध लागला . त्यांच्याशी बोलून Tamron १५०-६०० mm , Nikon head  लेन्स आरक्षित केली . मला हा पर्याय फारच आवडला. स्वस्त आणि मस्त . आता पुणे- शेगांव - ताडोबा- पुणे route नक्की करण्याचे काम सुरु केलं . बर्याच अभ्यासानंतर खालील route नक्की केला . पुणे- अहमदनगर - औरंगाबाद - जालना - देऊळगाव राजा - खामगाव - शेगांव - वर्धा - वरोरा - ताडोबा (मोहोरली गेट ) ताडोबा (मोहोरली गेट ) - वणी - यवतमाळ - कारंजा लाड - मेहकर - सिंदखेड राजा -जालना - औरंगाबाद - अहमदनगर -पुणे जवळपास सगळी तयारी झाली होती , अगदी कमीतकमी कपडे (म्हणजे अंगावर नाही , bag मध्ये ) घ्यायचे ठरवून hand bags भरुन झाल्

वाघोबा at ताडोबा भाग - २

सहा महिन्यापूर्वी साधारण मे महिन्यात माझी पुण्याला चक्कर झाली होती तेव्हा मी एक नवीन प्रकार बघितला . माझ्या घराजवळ zoomcar असं  लिहिलेल्या काही गाड्या बघितल्या . माझी उत्सुकता चाळवली , थोडा अधिक शोध घेता कळले कि हि एक Car Rental site आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे Self Drive . At Last ... भारतामध्ये Self Drive कार सुरु झाल्या . पण त्यावेळेस मला जास्त वेळ नसल्यामुळे मी फार काही पुढे बघितले नाही . पण आता अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला  Why not drive to Tadoba ? पटकन अंतर चेक केलं . पुणे  - ताडोबा साधारण ७५० किमी . Not Bad , manageable. विकांताला बाईसाहेबांशी बोलताना प्रस्ताव मांडला . पहिली प्रतिक्रिया " वेडा आहेस का? " पहिला धक्का ओसरल्यावर  पुढचे प्रश्न  "इतक्या लांब Drive ? जमणार आहे का ? मुलं आहेत बरोबर  , त्यांना जमणार आहे का? कंटाळतील ती . आई बाबा आहेत . बाबांच्या गुडघ्यांना त्रास होईल इतका वेळ बसून . " झालं … आमच्या फुग्याला टाचणी बसली . मी एवढ्या Bouncers ची अपेक्षा केली नव्हती . बरेच दिवस लांब राहत असल्यामुळे अश्या bouncy / उसळत्या खेळपट्टी वर खेळण्याचा स

वाघोबा at ताडोबा भाग - १

"Hey Rodney , Good Morning." "Very Good Morning .. Tell me." "Rodney , I am planning to take vacation in November for 2- 2 1/2 weeks." "OK , dates?" "From 10th till 30th . Can  you Pl. let me know if it's OK at the earliest as I need to book my flight ." "OK.. will let you know by end of day." "Thank You Rodney."  Manager बरोबर  वरील संभाषण ऑगस्ट महिन्यातलं . गेले वर्ष दीड वर्ष आस्मादिक मधु इथे (USA ) आणि चंद्र दोन उपग्रहांसह तिथे (पुणे ) परिस्थितीत . हम्म … बरोबर आहे ना ?…. म्हणजे मी मधू आणि बायको चंद्र ?? जाऊ दे ...  मला हे न सुटलेलं कोडं आहे .. कोण मधु आणि कोण चंद्र . असो . संध्याकाळी Manager चा मेल आला . "Go Ahead "... वाह…. लगेच तिकीट काढले . रात्री पुण्याला ही बातमी सांगितली मंडळी खुश झाली . पुढची गोष्ट म्हणजे काय काय करायचं ह्याचं planning सुरु झालं . मुलांना आणि सौ. च्या शाळांना सुट्टी असल्यामुळे , दिवसांचा प्रश्न नव्हता . दिवाळीचे दिवस झाल्यावर बाहेर जाऊ असे ठरले . पुढचे प्रश्न  , कोण