Posts

Showing posts from 2016

वाघोबावाघोबा at ताडोबा भाग - ५

Image
आज कोअर झोनची सफारी. मागिल भागात सांगितल्यानुसार , ५ वाजताच उठून सफारी गेट बदलून घेण्यासाठी साहेबांना भेटण्यासाठी गेलो . तिथे counter वर असलेल्या मैडमनी लगेच पावती दिली , शिवाय  photography लेन्सचे पैसे भरले. २५० mm जास्त मोठ्या लेन्स असल्यास २५० रु . भरावे लागतात , फक्त  कोअर झोन साठी . हा नियम मला थोडा विचित्र वाटला , पण शासनाचे काही नियम हे असेच आतर्क्य असतात. सफारी जीपवाले लवकरच आले होते . तिसर्या , चौथ्या  नंबरवर आमच्या गाड्या होत्या. सुदैवाने आम्हाला कालचाच driver मिळाला , म्हटले चला …. नशीब चांगलाय , आम्ही काल जसे तसेच बसलो , कालच्या लकी सीटवर . उगाच कालच्या लकी setup  मध्ये काही बदल नको . बरोबर ६.३० वाजता आम्ही आंत शिरलो. गाईडच्या सल्ल्यानुसार गाड्या वेगवेगळ्या दिशांना जाऊ लागल्या . जसजसे आतमध्ये जाऊ लागलो तसतसा एक बदल जाणवला , बफरच्या मानाने जंगल कमी घनदाट होतं . थोडं आश्चर्यच वाटलं . जास्त मोकळं  , गवताळ आणि वाघांच्या अस्तित्वाच्या खुणा दाखवणारं .  थोड्याच वेळांत , गाईडने गाडी थांबवायला सांगितली , "बघा , वाघाच्या पायाचे ठसे . ताजेच दिसतायत , म्हणजे नुकताच इकडुन गेल