वाघोबा at ताडोबा भाग - २
सहा महिन्यापूर्वी साधारण मे महिन्यात माझी पुण्याला चक्कर झाली होती तेव्हा मी एक नवीन प्रकार बघितला . माझ्या घराजवळ zoomcar असं लिहिलेल्या काही गाड्या बघितल्या . माझी उत्सुकता चाळवली , थोडा अधिक शोध घेता कळले कि हि एक Car Rental site आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे Self Drive . At Last ... भारतामध्ये Self Drive कार सुरु झाल्या . पण त्यावेळेस मला जास्त वेळ नसल्यामुळे मी फार काही पुढे बघितले नाही . पण आता अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला Why not drive to Tadoba ? पटकन अंतर चेक केलं . पुणे - ताडोबा साधारण ७५० किमी . Not Bad , manageable. विकांताला बाईसाहेबांशी बोलताना प्रस्ताव मांडला . पहिली प्रतिक्रिया " वेडा आहेस का? " पहिला धक्का ओसरल्यावर पुढचे प्रश्न "इतक्या लांब Drive ? जमणार आहे का ? मुलं आहेत बरोबर , त्यांना जमणार आहे का? कंटाळतील ती . आई बाबा आहेत . बाबांच्या गुडघ्यांना त्रास होईल इतका वेळ बसून . " झालं … आमच्या फुग्याला टाचणी बसली . मी एवढ्या Bouncers ची अपेक्षा केली नव्हती . बरेच दिवस लांब राहत असल्यामुळे अश्या bouncy / उसळत्या खेळपट्टी वर खेळण्याचा सराव गेला होता . अश्या वेळेस जे होते तेच झाले . शरणागती . "ठीक आहे . जाऊ बसनेच ." मी विषय संपवला . पण डोक्यातून काही जात नव्हते . मला स्वत:ला driving ची भयंकर आवड आहे , त्यातून अशी संधी मी सहजासहजी हातातून घालवणार नव्हतो . मी पुणे चंद्रपूर routes तपासणे चालूच ठेवले होते , रस्ते कसे आहेत , काय पर्याय आहेत हे बघणे चालूच होते. Then suddenly it hit me !!! YES !!!
दुसर्या दिवशी आईसाहेबांशी बोलत होतो . नेहेमीचे इकडच तिकडच बोलुन झाल्यावर मी हळूच विषय काढला . मी , "बर्याच दिवसांत शेगांवला जाणं झालं नाहीये ." आई ," हो ना . तू आता तिकडे आहेस , इकडे आलास तरी गडबडीत असतो , कसं काय जमणार ?" मी ह्याच क्षणाची वाट बघत होतो . "ह्यावेळेस जाऊ शकतो . आपण आता ताडोबाला जातोच आहोत तर तसं वाटेवरच आहे. " "हो. पण कसं जाणार ? रेल्वे असती तर जमलं असतं . एक दिवस थांबुन पुढे गेलो असतो . " "अजूनही जमेल . गाडी घेऊन गेलो तर जमेल. " मी म्हटले . दोन तीन क्षण शांतता . "ठीक आहे . चल ठेवतो आता फोन . मिटींगला ला जातोय ." एक दोन दिवसांनी भावाचा मेसेज "Busy आहेस का ?" फोन केला . भाऊ , "आई म्हणतीये शेगांव जमेल का ह्या trip मध्ये ." YES … मी माझा आवाज शक्य तितका नॉर्मल ठेऊन म्हणालो "असं म्हणतीय का आई ? हम्म … कसं काय जमेल बरं ?" "आई म्हणतीये गाडी घेऊन जायचं का " भाऊ . अवघड असतो हो आवाज नॉर्मल ठेवणे . "हो का ? जमेल की . " मी म्हटले . "पण आपण already नऊ जण आहोत , त्यातून भाड्याची गाडी घेतली तर Driver ची एक seat जाईल . " मी हळूहळू माझ्या मुद्द्यावर येत होतो . "Self Drive कार घ्यायची का ? ZoomCar ची ? मी बघितालीये site . तू सुध्दा बघ वाटल्यास एकदा . " भावाला हे अपेक्षित नसावे बहुदा . तो पण गडबडला . पण त्याला समजावले कि सहज जमेल . आपण दोघ आहोत आणि ब्रेक घेत घेत चालवू . मोठी गाडी (SUV )घेतली की गाडी चालवताना Fatigue येणार नाही आणि प्रवास सुद्धा आरामात होईल . ठीक आहे . चालेल म्हणाला . लगेचच ही खुशखबर बाई साहेबांना सांगितली . तिला समजले की मी आई-अस्त्र वापरुन तिला निष्प्रभ केलंय . थोडा फार गोळीबार केला पण ह्यावेळेस मी चिलखत घालून तयार असल्यामुळे फार काही नुकसान न होता मी ही लढाई जिंकली .
मला hatchback गाडी चालवायचा अनुभव , पण अधुनमधून मित्राची Innova चालवली होती त्यामुळे मला काही problem नव्हता . पण भावाला मोठ्या गाडीचा काही अनुभव नव्हता . त्यामुळे त्याने एक दिवस गाडी rent करून चालवून बघितली . खुश झाला . दरम्यान मी route planning सुरु केलं . TEAM-BHP चा नियमित वाचक असल्यामुळे तिकडूनच सुरुवात केली . पुणे -नागपुर -चंद्रपूर route बद्दल वाचायला सुरुवात केली . मग लक्षात आले की चंद्रपूर साठी नागपूर मार्गे जायची गरज नाही , तसेही आम्हाला शेगांव मार्गे जायचे होते . त्यादृष्टीने नियोजन करायला सुरुवात केली . आता आमचा आधीचा plan बदलावा लागणार होता . आधी आम्ही १५ तारखेला पोहोचून दुपारच्या सफारीला जाणार होतो . पण आता गाडी असल्यामुळे रात्रीचे driving जमणार नव्हते , तेव्हा पूर्ण plan च बदलला. असा .
१३ नोव्हें - सकाळी ६. ३० पुण्याहून प्रयाण . संध्याकाळी ५. ३० - ६. ०० पर्यंत शेगांव पोहोचणे . रात्री श्री . गजानन महाराज दर्शन . आनंद निवास मुक्काम .
१४ नोव्हें - सकाळी ९. ०० प्रयाण . संध्याकाळी ५. ३० पर्यंत ताडोबा पोहोचणे .
१५ , १६ नोव्हें - ताडोबा . दर दिवशी २ (सकाळ / दुपार ) ह्या प्रमाणे ४ सफारी .
१७ नोव्हें - ताडोबाहून सकाळी ९. ०० प्रयाण . संध्याकाळी ७. ३० - ८. ०० पर्यंत औरंगाबाद पोहोचणे . रात्री औरंगाबाद मुक्काम .
१८ नोव्हें - औरंगाबादहून सकाळी १०. ०० प्रयाण . थोडेफार औरंगाबाद दर्शन (बीबी का मकबरा वगैरे ). अहमदनगर मार्गे पुणे रात्री ८. ०० पर्यंत . जमल्यास नगरला Cavalry Tank Museum ला भेट .
रात्री गाडी चालवायची नाही आणि दर २ तासाने एक break असं नियोजन केलं . ह्यामुळे एक दिवस अधिक झाला होता , पण जास्त stress न घेत गाडी चालवणे ठरवलं असल्यामुळे इलाज नव्हता . पण ह्या नवीन plan मुळे एक नवीनच संकट उत्पन्न झालं होतं . ते म्हणजे सफारीचे (१५ सकाळ) आणि Resort (१४ रात्र) बुकिंग. पुन्हा एकदा बाई साहेबांची मनधरणी सुरु केली . पण ह्या वेळेस मामला कठीण होता , नाही म्हटले तरी मागच्या वेळेचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता . त्यामुळे ह्यावेळेस तोफगोळ्यांना वाटाघाटीनी उत्तर द्यायचे ठरवले . दिवाळीचा पाडवा जवळ आलाय अशी आठवण करुन दिली , मग काय …. झाला मूड ठीक . "उद्या जाते आणि बघते काही होतंय का " असा वायदा मिळवला . एका आठवड्यात कन्फर्मेशन आले . सगळ्या सफारी आणि resort बुकिंग झालंय . हुश्श … चला सगळं काही जमलं . दरम्यान भावाने गाडी बुक करून ठेवली होती . Everything is set … कोणी विचारले तर आम्ही आता अगदी आत्मविश्वसानाने सांगू शकत होतो , एकदम पु. ल. style " १३ नोव्हेंबर ला !!!!"
क्रमश :
जाता जाता - १. ह्या भागात सुद्धा फोटो नाही टाकले , कारण पहिल्या दोन्ही भागात मी trip च्या पूर्वतयारी विषयी लिहिले आहे , त्यामुळे फोटो टाकणे संयुक्तिक नाही वाटले . भरपूर फोटो आहेत जे पुढच्या भागात प्रकाशित करेनच . २. माझे आणि zoomcar चे कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत .

Comments
Post a Comment