जीना यहाँ , मरना यहाँ ...
एक टिपिकल सकाळ . डोळ्यांवर अजूनही असलेली झोप. कोणीतरी हाका मारून उठवतय , आपल्याला उठवत नाहीये , पण नाईलाज आहे. कसबस उठुन अर्धवट झोपेत ब्रश सुरु झालाय आणि तिकडे रेडियोवर 'भुले बिछडे गीत' सुरु झालंय , लता गातीये कधी ' राजा की आएगी बरात ... ' तर कधी 'बरसात मे हमसे मिले तुम ... ' . सत्तरच्या दशकात जन्मलेल्यांच्या आणि सकाळची शाळा असलेल्यांच्या घरातल हे अगदी रोजचं दृश्य. सकाळपासुन सुरु झालेला रेडिओ हा रात्री छायागीत , बेला के फुल ऐकुनच बंद व्हायचा. त्याकाळी रेडिओ हा मध्यम आणि निम्न मध्यमवर्गाच्या आयुष्याचा अगदी अविभाग्य घटक . नंतर साधारण ७८ ,७९ च्या सुमारास घरात टेलिव्हिजनचे आगमन झाले . अचानक इतके दिवस नुसती ऐकलेली गाणी प्रत्यक्ष दिसायला लागली. रेडिओमुळे गाण्यांचं संगीत , गायक आवडायचे आणि आता प्रत्यक्ष चित्रीकरण बघुन पडद्यावरचे कलाकार आवडू लागले. हळूहळू रेडिओ मागे पडायला लागला. तरीही सकाळी रेडिओ हा हवाच , त्यामुळे 'भुले बिछडे गीत' ऐकू येतंच होतं . नंतर पुढे उच्च शिक्षणासा...