Posts

Showing posts from 2020

श्री सो.डी.माहात्म्य द्वितीय अध्याय

श्री सो.डी.माहात्म्य   द्वितीय  अध्याय  आटपाट नगर होतं. नगरजन खाऊन पिऊन सुखी होते .  दर पाच वर्षांनी तिथे नवीन राजा राज्यकारभार सांभाळी . थेट लोकांमधून राजा निवडला जाई. लोकांना कारभार नाही आवडला तर ते नवीन राजा निवडू शकत होते. अशी सगळी आदर्श राज्यकारभाराची पद्धती होती. जणू रामराज्यच.  एकदा काय झालं , लोकांनी एका नवीनच स्वर्णकेशी नामक राजाला निवडून दिलं . त्याने निवडून आल्या आल्याच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली. लोकं त्याच्या कारभारावर अगदी खुश होते . राजा आपल्या दरबारात बसला होता , तेव्हा सेनापती त्याला म्हणाला "महाराज आत्ताच  गुप्तचराने खबर आणली आहे , आपल्या शेजारील राज्यांत कोणत्या तरी गूढ रोगाने धुमाकूळ घातला आहे. आपण सुद्धा सतर्क राहायला हवं ."  "ह्य ... सेनापती , तुमचं काय डोकं बीक फिरलंय काय ?" राजा एकदम चिडून म्हणाला "आपली एवढी शक्तिशाली सैन्य , आरोग्य यंत्रणा असताना कसली चिंता आणि  आपण चारी बाजूनं समुद्राने वेढलेले असताना , काय बिशाद आहे कोणताही रोग आपल्यावर हल्ला करण्याची ? "  "नाही महाराज . हे प्रकरण काहीतरी वेगळंच

श्री सो.डी.माहात्म्य

श्री सो.डी.माहात्म्य  अध्याय पहिला  कैलास पर्वतावर शंकर पार्वती बसलेले आहेत. मुलं सुद्धा त्यांच्या त्यांच्या उद्योगात . समोर नंदी नेहेमीप्रमाणे आळसावलेलाय . आज अचानक पार्वतीला प्रश्न पडलाय,  म्हणाली " हे नाथ, हे मी काय बघतीये. गेले काही दिवस अचानक पृथ्वी वरचे मळभ हटलंय . सगळं कसं स्वच्छ , सुंदर , निर्मळ. हे अचानक असं कसं काय घडलं नाथ ? " शंकरांच्या चेहऱ्यावर हलकेच स्मित उमटलं. म्हणाले " उमा, मी बघतोय , गेले काही दिवस तुझं तुझ्या लाडक्या पृथ्वीकडे फारसं लक्ष नाहीये . फेसबुक वापरणं सोडून नाही ना दिलंस." "नाही हो स्वामी . आत्ताच नवीन पोस्टला लाईक करून आले. पण खरं आहे तुमचं. " पार्वती म्हणाली. " गेले ४०-४५ दिवस  देवळातली गर्दी कमी झाल्याने , मानवाकडे आणि पर्यायाने पृथ्वी कडे थोडं दुर्लक्षच झालं माझं. गजानन आणि कार्तिक देखील मला म्हणाले.  सध्या त्यांचं देखील काम बरंच कमी झालंय . म्हणूनच विचारतीये नाथ , हे असं कसं काय घडलं ? मानवापुढील सर्व समस्या सुटल्या काय ? की तो खरंच शहाणा झाला? सांगा..  स्वामी मला लवकर सांगा. नाहीतर मी गुगलवर शोधेन हं "