Posts

जीना यहाँ , मरना यहाँ ...

एक टिपिकल सकाळ . डोळ्यांवर अजूनही असलेली झोप. कोणीतरी हाका मारून उठवतय , आपल्याला उठवत नाहीये , पण नाईलाज आहे. कसबस उठुन अर्धवट झोपेत ब्रश सुरु झालाय आणि तिकडे रेडियोवर 'भुले बिछडे  गीत' सुरु झालंय , लता गातीये कधी  ' राजा की आएगी बरात  ... '  तर कधी 'बरसात मे  हमसे मिले तुम ... ' . सत्तरच्या दशकात जन्मलेल्यांच्या आणि सकाळची शाळा असलेल्यांच्या घरातल हे अगदी रोजचं दृश्य. सकाळपासुन सुरु झालेला रेडिओ हा रात्री छायागीत , बेला के फुल ऐकुनच बंद व्हायचा.  त्याकाळी रेडिओ हा मध्यम आणि निम्न मध्यमवर्गाच्या आयुष्याचा अगदी अविभाग्य घटक . नंतर साधारण ७८ ,७९ च्या  सुमारास घरात टेलिव्हिजनचे आगमन झाले . अचानक इतके दिवस नुसती ऐकलेली गाणी प्रत्यक्ष दिसायला लागली. रेडिओमुळे  गाण्यांचं संगीत , गायक आवडायचे  आणि आता प्रत्यक्ष चित्रीकरण बघुन पडद्यावरचे कलाकार आवडू लागले. हळूहळू रेडिओ मागे पडायला लागला. तरीही सकाळी रेडिओ हा हवाच , त्यामुळे 'भुले बिछडे  गीत' ऐकू येतंच होतं . नंतर पुढे  उच्च  शिक्षणासा...

वाघोबावाघोबा at ताडोबा भाग - ५

Image
आज कोअर झोनची सफारी. मागिल भागात सांगितल्यानुसार , ५ वाजताच उठून सफारी गेट बदलून घेण्यासाठी साहेबांना भेटण्यासाठी गेलो . तिथे counter वर असलेल्या मैडमनी लगेच पावती दिली , शिवाय  photography लेन्सचे पैसे भरले. २५० mm जास्त मोठ्या लेन्स असल्यास २५० रु . भरावे लागतात , फक्त  कोअर झोन साठी . हा नियम मला थोडा विचित्र वाटला , पण शासनाचे काही नियम हे असेच आतर्क्य असतात. सफारी जीपवाले लवकरच आले होते . तिसर्या , चौथ्या  नंबरवर आमच्या गाड्या होत्या. सुदैवाने आम्हाला कालचाच driver मिळाला , म्हटले चला …. नशीब चांगलाय , आम्ही काल जसे तसेच बसलो , कालच्या लकी सीटवर . उगाच कालच्या लकी setup  मध्ये काही बदल नको . बरोबर ६.३० वाजता आम्ही आंत शिरलो. गाईडच्या सल्ल्यानुसार गाड्या वेगवेगळ्या दिशांना जाऊ लागल्या . जसजसे आतमध्ये जाऊ लागलो तसतसा एक बदल जाणवला , बफरच्या मानाने जंगल कमी घनदाट होतं . थोडं आश्चर्यच वाटलं . जास्त मोकळं  , गवताळ आणि वाघांच्या अस्तित्वाच्या खुणा द...

वाघोबा at ताडोबा भाग - ४

Image
थोडं ताडोबाविषयी . ताडोबाचे (भारतातल्या सगळ्याच  टायगर रिसर्व ) २ भाग पडतात . बफर आणि कोअर  झोन. नावाप्रमाणेच कोअर  झोन हा वाघांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा इथे कोणत्याही प्रकारच्या मानवी अतिक्रमणाला बंदी . वाघाचे  वास्तव्य , शिकार , विश्रांती आणि प्रजनन साधारण ह्या भागात असते . बफर झोन हा  कोअर  च्या बाहेरचा अंदाजे १० किमी पर्यंत , पण संरक्षित . इथे काही भागात मानवी वस्ती , रस्ते असतात . ताडोबाचा कोअर  हा जवळपास ६२६ sq . km आणि बफर ११०१ sq km ( जंगल ७०० sq km आणि जंगल नसलेला ४०१ sq km ). बफर झोनच्या सफारीसाठी आरक्षण करता येत नाही , तिथे (गेट) वर त्या त्या वेळेस जाऊन करावे लागते . कोअर  सफारी साठी आधीच आरक्षण करावे लागते . दोन्ही ठिकाणी सकाळी ६.३० (उन्हाळ्यामध्ये ६.००) आणि दुपारी ३.०० वाजता मर्यादित गाड्या आंत सोडतात. गाडीत फक्त ६ पर्यटक + १ गाईड + ड्रायव्हर एवढेच प्रवासी. गाडीतून खाली उतरायला बंदी . ताडोबाला खालील प्रमाणे...

वाघोबा at ताडोबा भाग - ३

Image
जसजसा माझा Flight चा दिवस जवळ येत होता , तसतशी माझी हुरहूर वाढत चालली होती . एक तर मी जवळपास ६ महिन्यांनी घरच्यांना भेटणार होतो , जरी Skype वर जवळजवळ रोज भेटणं होत होतं तरी प्रत्यक्ष भेटणं वेगळंच . दुसरे म्हणजे ताडोबा खुणावत होता . दरम्यान इतर तयारी सुद्धा जोरात चालू होती . Driving खालोखाल माझा दुसरा शौक म्हणजे Photography . माझ्याकडे ७० -३०० mm ची लेन्स  आहे पण birding साठी ही कमी पडेल असं वाटलं , तेव्हा Reantal लेन्सचा शोध लागला . त्यांच्याशी बोलून Tamron १५०-६०० mm , Nikon head  लेन्स आरक्षित केली . मला हा पर्याय फारच आवडला. स्वस्त आणि मस्त . आता पुणे- शेगांव - ताडोबा- पुणे route नक्की करण्याचे काम सुरु केलं . बर्याच अभ्यासानंतर खालील route नक्की केला . पुणे- अहमदनगर - औरंगाबाद - जालना - देऊळगाव राजा - खामगाव - शेगांव - वर्धा - वरोरा - ताडोबा (मोहोरली गेट ) ताडोबा (मोहोरली गेट ) - वणी - यवतमाळ - कारंजा लाड - मेहकर - सिंदखेड राजा -जालना - औरंगाबाद...

वाघोबा at ताडोबा भाग - २

सहा महिन्यापूर्वी साधारण मे महिन्यात माझी पुण्याला चक्कर झाली होती तेव्हा मी एक नवीन प्रकार बघितला . माझ्या घराजवळ zoomcar असं  लिहिलेल्या काही गाड्या बघितल्या . माझी उत्सुकता चाळवली , थोडा अधिक शोध घेता कळले कि हि एक Car Rental site आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे Self Drive . At Last ... भारतामध्ये Self Drive कार सुरु झाल्या . पण त्यावेळेस मला जास्त वेळ नसल्यामुळे मी फार काही पुढे बघितले नाही . पण आता अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला  Why not drive to Tadoba ? पटकन अंतर चेक केलं . पुणे  - ताडोबा साधारण ७५० किमी . Not Bad , manageable. विकांताला बाईसाहेबांशी बोलताना प्रस्ताव मांडला . पहिली प्रतिक्रिया " वेडा आहेस का? " पहिला धक्का ओसरल्यावर  पुढचे प्रश्न  "इतक्या लांब Drive ? जमणार आहे का ? मुलं आहेत बरोबर  , त्यांना जमणार आहे का? कंटाळतील ती . आई बाबा आहेत . बाबांच्या गुडघ्यांना त्रास होईल इतका वेळ बसून . " झालं … आमच्या फुग्याला टाचणी बसली . मी एवढ्या Bouncers ची अपेक्षा केली नव्हती . बरे...

वाघोबा at ताडोबा भाग - १

"Hey Rodney , Good Morning." "Very Good Morning .. Tell me." "Rodney , I am planning to take vacation in November for 2- 2 1/2 weeks." "OK , dates?" "From 10th till 30th . Can  you Pl. let me know if it's OK at the earliest as I need to book my flight ." "OK.. will let you know by end of day." "Thank You Rodney."  Manager बरोबर  वरील संभाषण ऑगस्ट महिन्यातलं . गेले वर्ष दीड वर्ष आस्मादिक मधु इथे (USA ) आणि चंद्र दोन उपग्रहांसह तिथे (पुणे ) परिस्थितीत . हम्म … बरोबर आहे ना ?…. म्हणजे मी मधू आणि बायको चंद्र ?? जाऊ दे ...  मला हे न सुटलेलं कोडं आहे .. कोण मधु आणि कोण चंद्र . असो . संध्याकाळी Manager चा मेल आला . "Go Ahead "... वाह…. लगेच तिकीट काढले . रात्री पुण्याला ही बातमी सांगितली मंडळी खुश झाली . पुढची गोष्ट म्हणजे काय काय करायचं ह्याचं planning सुरु झालं . मुलांना आणि सौ. च्या शाळांना सुट्टी असल्या...

तो आणि आम्ही

Virat ची Adelaide ची  innings बघितली  ....  १९९९ च्या Pakistan विरुद्ध ची आठवण ताजी  झाली.  आज एक वर्ष होऊन गेले त्याला retired होऊन . कित्येक आठवणी चित्रपटा प्रमाणे डोळ्यासमोर तरळल्या . साल १९८७ , तुम्ही शाळेतून धावत पळत घरी येता , पाठीवरचे  दप्तर ही न काढता T .V. लावता. हुश्श  …!!! तो खेळत असतो . आई ने काय पानात वाढलंय  तुमचे लक्ष नसते कारण तुमचे सगळे लक्ष त्याच्याकडे , भारताला जिंकायला  ४१ runs बाकी …. आणि .... umpire च्या चुकीच्या निर्णयामुळे तो बाद होतो. आपण तो सामना १६ runs ने हारतो.  ती त्याची शेवटची test innings असते . सामना अर्थातच पाकिस्तान विरुद्धचा बंगलोरचा . संध्याकाळी वडिल घरी येतात , थोडेसे उदास , नीट जेवत नाहित , म्हणतात सुनील गावस्कर ची शेवटची कसोटी , पुन्हा दिसणार नाही तो खेळतांना. खूप उदास भासतात , आपण खूप लहान असतो, आपल्याला कळत नाही ह्यात एवढे काय आहे , तुम्ही थोडे मोठे म्हणजे कळत्या वयाचे होता , १० पास होऊन junior college मध्ये जाता , नवीन वातावरण , नवीन विषय , आजूबाजूची मु...