श्री सो.डी.माहात्म्य द्वितीय अध्याय
श्री सो.डी.माहात्म्य द्वितीय अध्याय आटपाट नगर होतं. नगरजन खाऊन पिऊन सुखी होते . दर पाच वर्षांनी तिथे नवीन राजा राज्यकारभार सांभाळी . थेट लोकांमधून राजा निवडला जाई. लोकांना कारभार नाही आवडला तर ते नवीन राजा निवडू शकत होते. अशी सगळी आदर्श राज्यकारभाराची पद्धती होती. जणू रामराज्यच. एकदा काय झालं , लोकांनी एका नवीनच स्वर्णकेशी नामक राजाला निवडून दिलं . त्याने निवडून आल्या आल्याच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली. लोकं त्याच्या कारभारावर अगदी खुश होते . राजा आपल्या दरबारात बसला होता , तेव्हा सेनापती त्याला म्हणाला "महाराज आत्ताच गुप्तचराने खबर आणली आहे , आपल्या शेजारील राज्यांत कोणत्या तरी गूढ रोगाने धुमाकूळ घातला आहे. आपण सुद्धा सतर्क राहायला हवं ." "ह्य ... सेनापती , तुमचं काय डोकं बीक फिरलंय काय ?" राजा एकदम चिडून म्हणाला "आपली एवढी शक्तिशाली सैन्य , आरोग्य यंत्रणा असताना कसली चिंता आणि आपण चारी बाजूनं समुद्राने वेढलेले असताना , काय बिशाद आहे कोणताही रोग आपल्यावर हल्ला करण्याची ? " "नाही महाराज . हे प्रकरण काहीतरी वेगळंच